रायते पुलाला जोडणारा रस्ता खचला, कल्याण-नगर महामार्ग झाला बंद

बालकृष्ण मोरे

कल्याण / कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलाला जोडणारा रस्ता खचल्याने कल्याण-नगर महामार्ग झाला बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे रायते पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा (पांजरपोळ दिशेकडील) भलामोठा भाग गेला वाहून आहे.

कल्याण परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. अंबरनाथच्या काकोळे येथील जीआरपी रेल्वेचेक्स धरण (बांध ) तुटला आहे तर या बरोबरच कल्याण नगर मार्गावरील रायते पुलाला जोडणारा रस्ता देखील खचला आहे.त्या मुळे कल्याण नगर मार्गावरील वाहतूक इतर मार्गा कडून वळविण्यात आली आहे.

हा खचलेला रस्ता राज्य महामार्ग असून येथे नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. हा रस्ता खचल्याने आता वाहतूक वळविण्यात आली आहे.लवकरच हा खचलेला रस्ता बनविला जाईल असे या बाबत सांगितले जात आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email