रिपाइं (इंदिसे) ची नागपुरात उग्र निदर्शने
ठाणे दि.१२ :- भीमा कोरेगाव हल्ल्यानंतर उत्स्फूर्तपणे पुकारलेल्या बंद आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील तसेच मराठा मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, या मागणीसाठी रिपाइं (इंदिसे) च्या वतीने मंगळवारी (दि.१७) नागपूर येथील यशवंतराव स्टेडियम येथे युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे, अध्यक्ष विकास निकम, राष्ट्रीय महासचिव उत्तमराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात सुमारे दीड हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. ०१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी तसेच मुंबईतील दादर येथील इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासंदर्भात लाखोंच्या संख्येने आंबेडकरी समाज जमला होता.
हेही वाचा :- डोंबिवली-कोपर दरम्यान लोकलमधून पडून तरुणीचा बळी
मात्र मानवंदना देऊन घरी परतणार्या आंबेडकरी अनुयायांवर अमानुष हल्ला केला गेला, दगडफेक करण्यात आली होती. समाजकंटकांनी योजनाबद्धरितीने अनेक गाड्यांची तोडफोड केली व जाळपोळ केली. या हल्ल्यात अनेक बांधव जखमी झाले होते. या प्रकारामुळे दलित समाज अस्वस्थ झाला होता. या प्रकारचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील दलित समाज स्वयंस्फुर्तीने रस्त्यावर उतरला होता. तत्कालीन सरकारविरोधातील खदखद व्यक्त करण्यासाठी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो तरूणांवर व महिलांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव १९४९-५० मध्ये दिला होता.
हेही वाचा :- कल्याण मध्ये “राष्ट्र कल्याण पार्टी” ची स्थापना
आता मराठा समाजाने त्याच उद्देशाने मोर्चे काढले होते. मराठा समाजाने अत्यंत शांततेत मोर्चे काढलेले असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकप्रकारे या समाजावर तो अन्यायच आहे. त्यामुळे मराठा मोर्चा आंदोलकांवरीलही गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी या मोर्चेकर्यांच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या. यावेळी सदर मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्यात येईल , असे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले. विशेष म्हणजे निदर्शकांच्या वतीने करण्यात आले आलेली आलेली पॅनल पद्धत रद्द करण्याची मागणी आजच मंजूर करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा :- ‘छे..छे..झुकली रे झुकली, मराठी बाणा सांगणारी सेना झुकली!’
यावेळी बोलताना भैय्यासाहेब इंदिसे यांनी , “”गेल्या काही ही वर्षात दलितांची कोंडी करण्याची प्रवृत्ती वाढीस लागल्याचे दिसून आले आहे फडणवीस सरकारच्या काळात घडलेल्या भिमा कोरेगाव हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या मनोहर भिडे याच्यासारख्या सांगली दंगलीतील आरोपीला मोकाट सोडून गोरगरीब आंबेडकरी तरुणांना गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आताचे सरकार हे शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा मानणारे सरकार आहे. जर हे सरकार खरोखर शिवरायांच्या कार्यपद्धतीवर आणि बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास ठेवणारे असेल तर त्यांनी आंबेडकरी तरुणांवर वरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत या अधिवेशनात यासंदर्भातील निर्णय न घेतल्यास पुढील काळात उग्र आंदोलन रिपाई इंदिसे गटाच्या वतीने देण्यात येईल””, असा इशारा दिला