Latest News ; राज्याभरातील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान…
मुंबई दि.२२ :- राज्याभरात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सोयाबीन आणि कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही मुसळधार पावसाने झोडपले. मागील तीन ते चार दिवसात पडत असलेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा जरी प्रश्न मिटला तरी शेतकऱ्यांनी उगवलेला सोयाबीन पाऊसमुळे खराब होत आहे.
हेही वाचा :- Election news update ; ‘अरे उद्धवा! तेव्हा १ रुपयांत आरोग्य तपासणी का नाही केली?’ – अजित पवार
जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात सोयाबीन हे पीक घेतले जाते, त्यामुळे अवेळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना पुन्हा भरपाईला सामोरं जावं लागणार आहे. लातूर जिल्ह्यातील परतीच्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तावरजा, मन्याड या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. निलंगा तालुक्यातील तेरणा नदीवरील राजेगाव, मदनसुरी, कोकळगाव, लिंबाळा, गुंजरगा येथील उच्चस्तरीय बंधारे काही मीटरने उघडण्यात आले आहेत.
हेही वाचा :- तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, – उद्धव ठाकरे
त्यामुळे तेरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मतांच्या टक्केवारी परिणाम झालाच. त्याचबरोबर काढणीला आलेली सोयाबीन पावसामुळे काळी पडू लागलीये, यामुळे पिकांना अपेक्षित हमी मिळणार नाही… जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात सोयाबीन हे पीक घेतले जाते, त्यामुळे अवेळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना पुन्हा भरपाईला सामोरं जावं लागणार आहे.