रिजन्सी बिल्डरने नियम बसवले धाब्यावर, एमएसआरडीसी, एमएसइडीसी,केडीएमसी, एमआयडीसी ची डोळेझाक

(बालकृष्ण मोरे)

कल्याण / कल्याण शील रोड वरील सुयोग हॉटेल जवळ सर्व नियम धाब्यावर बसवत रिजन्सी बिल्डरने आपल्या सांडपाण्याचा निचरा होण्या साठी बनवलेल्या नाल्याचचे खोदकाम करताना सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत.पण या बाबत शासकीय संस्था डोळेझाक करीत आल्याचे दिसून येत आहे.हे खोदकाम केलेल्या कामात अनेक अनियमितता दिसून येत आहे. रिजन्सी बिल्डरने सुयोग्य हॉटेल येथे आपला रिजन्सी अनंतम् हा बांधकाम प्रोजेक्ट सुरू केला आहे.या प्रोजेक्टच्या सांडपाण्याचा निचरा होण्या साठी नाला खोदण्याचे काम सुरू केले आहे.या नाल्याच्या प्रवाह कल्याण शील रोडच्या आडवा नेताना व त्यावर कळवट बनवताना वाहतूक विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समजते.या बरोबरच तिथे असलेला विद्युत पोल देखील खोदकाम करताना कलला होता त्या मुळे या विभागातील विधुत पुरवठा ५ तास बंद झाला होता.

या प्रकारा मुळे येथील नागरिकांचे हाल झाले होते.या कामा मुळे ट्रॅफिक देखील जाम झाली होती.आधीत येथील पत्री पूलचे काम सुरू असल्याने येथे मोठी वाहतूक कोंडी होता असताना हा वाहतूक कोंडीचा प्रकार घडला होता.येथे एमआयडीसी ची पाईप लाईन जाते पण त्याच्या वरून हा सांडपाण्याचा प्रवाह नेण्यात आल्याने आरोग्याचा धोका देखील वाढला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या नाल्याचे खोदकाम करताना वाकलेल्या पोल बाबत विधुत विभागाचे कार्यकारी अभियंता गवळी यांनी सांगितले की आम्ही या बाबत कारवाइच्या प्रोसेस मध्ये आहोत.या घटनेला २४ तास होऊनही अजून प्रोसेस चालू असल्याचे सांगितले गेल्याने विधुत विभाग कारवाई करण्याच्या मनस्थिती नसल्याचे दिसून येत आहे.या सर्व घटने मुळे नागरिकांन मध्ये मात्र रोष पसरला असल्या आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email