डोंबिवली ; रेरा कायद्याचा महिला पतपेढीवर परिणाम कर्ज घेणा-याचा ओघ कमी झाला
डोंबिवली दि.२४ – ३५ वर्षांपूर्वी डोंबिवली लहान खेडेगाव होते ,महिलांना आपल्या पायावर उभे करता यावे म्हणून कांचन गौरी महिला पतपेढी सुरू करण्यात आली सध्या पतपेढीच्या १२ शाखा आहेत. पतपेढीची आर्थिक स्थिती भक्कम असली तरी नोट बंदी व रेरा कायदा यांचा परिणाम कर्ज वितारणावर झाला असून यामुळे कर्ज घेणा-याचा ओघ कमी झाला. अशी माहिती पतपेढीच्या अध्यक्ष उर्मिला प्रभुघाटे यांनी दिली. डोंबिवली पत्रकार संघाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी बेंकेच्या व्यवस्थापिका ज्योती भावे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सहकार विभागाने यापुढे महिला पतपेढ्याना नोंदणी देणे बंद केली. असल्याचे सांगून रिझर्व बॅंक व सहकार खाते या दोघांच्या जाचक अटीमुळे व्यवसायावर परिणाम होत आहे.
हेही वाचा :- फुलांनी सजलेल्या राजधानी एक्स्प्रेसचे कल्याण स्थानकावर जोरदार स्वागत
पातपेढीला महाराष्ट्रात शाखा सुरू करण्याची परवानगी मिळाली असून आता कांचन गौरी पतपेढीच्या शाखा ठाणे जिल्ह्याबाहेर सुरू करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात “कोकण महिला पतसंस्था फेडरेशन “स्थापन करण्यात आले असून पाच जिल्ह्यात महिला पतसंस्थेच्या ९० शाखा असल्याचे त्यांनी सांगितले. “संक्रात दानापत्र “योजना अनेक ठिकाणी राबवली जाते. हळदी कुंकू समारंभात महिला वस्तू लुटतात. त्या पेक्षा त्यांनी दान पत्रात पैसे टाकावे व ते पैसे आदिवासी पांडे ,भूकंप ,प्रलय अशाप्रसंगी वापरले जातात. याला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.