उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेवर बलात्कार

मुंबई दि.२३ :- येथे एकाच कंपनीत सहकाऱ्यानमध्ये एकत्र काम करत असल्याने त्यांची तिथे मैत्री झाली. याच मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाल्याने त्यांच्यात वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण झाले होते. दरम्यान स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी आरोपीने फिर्यादी महिलेकडून दहा लाख रुपये घेतले होते.

हेही वाचा :- तोतलाडोह धरणामध्ये दोन वर्षे पुरेल इतके पाणी साठा

त्यातील तीन लाख पन्नास हजार गूगल पेद्वारे तर उर्वरित रक्कम ही रोखस्वरुपात दिली होती. त्यानंतर सदरची कंपनी बंद पडल्याने आरोपी सुर्जीत हा पुण्यामध्ये नऱ्हे या ठिकाणी रहावयास आला. फिर्यादी महिला पुण्यात आल्यानंतर सुर्जीतकडे दिलेले १० लाख रुपये परत मागितल्याने सुर्जीतने चिडून जाऊन शिवीगाळ करून मारहाण केली.

हेही वाचा :- Dombivali ; पत्ते खेळताना बोलवल्याने महिलेची हत्या

तसेच त्याच्याच घरी नेवून माझी इच्छा नसताना जबरदस्तीने बलात्कार केली असल्याची फिर्याद महिलेने केली आहे. हा प्रकार १९ जुलै ते २० जुलै दरम्यान नऱ्हे येथे घडल्याने सुर्जीत यादव यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील करीत आहेत.

येई हो आमदारा ,माझ्या जाणता राजा ! निवडणूक आली , तुझी वाट मी पाहे !!
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email