राज ठाकरे यांचे फडणवीस सरकारवर टिका

प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचं काय काम?,’ असा सवाल करतानाच ‘ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारनं सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये,’ असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यातील भाजप सरकारला दिला आहे.

हेही वाचा :- आज रात्री दिसेल शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण

मराठा मोर्चाने बुधवारी मुंबईत पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडणारे एक निवेदन काढून राज्यसरकारला खडेबोल सुनावले आहेत. ‘सरकारनं वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी. आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे? किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत? सरकारचं धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचं आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरंच भविष्यात रोजगार असणार आहे का? कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय? त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय? ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात,’ अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा :- सैनिकांच्या मुलांसाठी वसतिगृह प्रवेशाचे आवाहन

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email