सुधारित नागरिकत्व कायद्यावर राज ठाकरेंनी केलं भाष्य म्हणाले…

मुंबई दि.१९ :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी अल्पसंख्याक धर्मगुरू ,विचारवंत आणि पक्षातील अल्पसंख्याक समाजातील पदाधिकारी यांच्या सोबत सध्या देशात CABNRC विषयात चाललेल्या घडामोडी संबंधी चर्चा केली. यावेळी राज ठाकरेंनी उपस्थितांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं. तसेच सरकार किती लोकांना अटक करु शकते? अख्या देशाला कैदेत ठेवणार का? म्हणून सांगतो, ते काहीच करू शकणार नाहीत, तितकी यंत्रणा ही नाही म्हणून संयम ठेवा! असं आवाहन राज ठाकरेंनी बैठकीत अल्पसंख्याक समुदायाला केलं.

हेही वाचा :- हिंदूंच्या संघटितशक्तीच्या दबावाचा परिणाम; ‘दबंग ३’ चित्रपटाच्या गाण्यातील आक्षेपार्ह प्रसंग वगळले !

गेल्या काही दिवसांपासून सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी मुद्द्यावरुन देशभरात वादंग पेटलं असताना अल्पसंख्याक समुदायाच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या बैठकीत राज ठाकरे म्हणाले की, “सरकारला जे हवे आहे ते करू नका, सरकारला मंदी वरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ह्या गोष्टी घडवून आणायच्या आहेत. आंदोलन, जाळपोळ, दंगली हे त्यांना हवेच आहे आणी जे त्यांना हवे आहे ते आपण का करावे? असा सवाल त्यांनी चर्चेत उपस्थित केला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email