रेल्वे मोटरमॅन चं लाजिरवाण कृत्य .. लघुशंका करण्यासाठी चक्क थांबिवली संपूर्ण लोकल ट्रेन, LIVE

तांत्रिक बिघाडामुळे लोकल वाहतुकीची कोंडी आणि त्यामुळे होणारा त्रास हे तर मुंबई लोकल रेल्वे चं नेहमीचं ठरलेलं समीकरण. परंतु रेल्वे चालवणाऱ्या मोटरमन च्या लघशंकेकरिता रेल्वे ची कोंडी पाहिलांद्याच पहावयास मिळाली. उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी स्टेशन च्या दरम्यान ट्रेन थांबवून मोटरमन ने रुळावर उतरून लघुशंका केली आणि तो पर्यंत लाखों चाकरमानी वाट बघत होते ट्रेन सुरळित सुरू होण्याची

मध्य रेल्वे च्या रेल्वे लोकल चालवणाऱ्या मोटरमन च एक अतिशय लाजिरवाण कृत्य समोर आलं आहे. ते म्हणजे उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी स्टेशन च्या दरम्यान ट्रेन थांबवून मोटरमन ने रुळावर उतरून लघुशंका केली. एरवी स्वच्छ अभियानाचे धडे शिकवणार प्रशासन आणि रुळावर लघुशंका व सौचास बसणाऱ्या सर्वसामान्य जनतेकडून दंड वसुलणार रेल्वे प्रशासनास आपल्या कर्मचाऱ्यास नैतिक ज्ञान देण्याचा कदाचित विसर पडला असावा. हे कृत्य अतिशय लाजिरवाणे असून यात सार्वसामान्य चाकरमानी रेल्वे प्रवाश्याना नाहक त्रास सहन करावा लागला एवढे मात्र नक्की.

Sources – ABI News

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email