कल्याणच्या रेल्वे रिक्षा स्टँडवर राडा
डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरात राहणारे सलिम नजे हे व्यावसायाने रिक्षाचालक आहेत. सलिम हे शनिवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा स्टँडवर रिक्षा लावून उभे होते. यावेळी एक रिक्षाचालक त्या ठिकाणी आला. त्याने इथे रिक्षा लावू नका, माझा नंबर आहे, अशी दमबाजी करत सलिम यांना शिवीगाळ केली. त्यामुळे रिक्षाचालक सलीम यांनी तू शिवी देऊ नकोस, मी माझी रिक्षा लाईनमध्ये लावली आहे, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही संतापलेल्या सदर रिक्षाचालकाने सलिम यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढविला. या हल्ल्यात सलिम नजे जबर जखमी झाले. त्यांच्या जबानीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी फरार हल्लेखोर रिक्षावाल्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: