राष्ट्र कल्याण पार्टी चा जाहीर पाठिंबा…
कल्याण पुर्व मध्ये नागरिकांना चालण्यासाठी एकही पदपथ फुटपाथ मोकळा नाही. सर्व पदपथ फुटपाथ यावर दुकानदार व अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामूळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांवर तोडगा काढून संबंधित दुकानदार व अनधिकृत फेरीवाले यांच्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी.
यासाठी सर्व पक्षीय, सामाजिक संस्था संघटना व रिक्षा चालक मालक यांचे सुरु असलेल्या बेमुदत उपोषण ला ‘राष्ट्र कल्याण पार्टी’ तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला असुन या आंदोलन उपोषण मध्ये नागरिकांच्या हक्कासाठी सक्रिय सहभागी असेल असे पत्र ‘राष्ट्र कल्याण पार्टी’ चे राष्ट्रीय अध्यक्ष शैलेश तिवारी व राष्ट्रीय महासचिव राहुल काटकर आणि पदाधिकारी यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेऊन माजी नगरसेवक शरद पाटील यांना पत्र दिले. त्यावेळी आजी-माजी नगरसेवक, सर्व पक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था संघटना व रिक्षा चालक मालक चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.