हिंदुत्वनिष्ठांच्या अन्याय्य अटकेचा निषेधार्थ ठाण्यात आंदोलन
राष्ट्रप्रेमी आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकमुखी मागणी
ठाणे - मुंबई येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता (अॅड.) संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सी.बी.आय.ने) दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी २५ मे या दिवशी अटक केली. या प्रकरणी गेल्या ३ वर्षांत सी.बी.आय.ने अनेक निरपराध हिंदूंना संशयित म्हणून अटक केली आहे. त्यांनी केलेली ही कारवाई अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह आहे. या सर्व प्रकरणात सी.बी.आय.चे वागणे, हे संशयास्पद आणि हिंदुत्ववाद्यांवर दबावतंत्र निर्माण करणारे आहे. हे सर्व हिंदुत्ववादी म्हणवणारे शासन सत्तेत असतांना होत आहे, हे आम्हा सर्व हिंदूंना धक्कादायक आहे, तरी अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना त्वरित सन्मानाने मुक्त करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी केली.
यावेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घोषणा देत या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवत अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी सिद्ध आहोत हे दाखवून दिले.
ठाणे (प.) रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलाच्या खाली २७ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यावेळे शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर अनेकांनी स्वाक्षरी करून आपला निषेध नोंदवला.
अधिवक्ता पुनाळेकरांची अटक म्हणजे हिंदुत्वाचे प्रामाणिकपणे कार्यकारणाऱ्यांची गळचेपीच ! – वैद्या दिक्षा पेंडभाजे, सनातन संस्था
‘‘आतंकवाद्यांना वकील मिळतात आतंकवाद्यांसाठी मानवाधिकारवाले दयेची याचिका करतात. मात्र केवळ संशयीत म्हणून पकडलेल्या आरोपींची बाजू मांडणार्या अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना त्याच गुन्ह्यात अडकवून अटक केली जाते आणि ती अटकही निवडणूक पार पडून गेल्यावर होते, हे पद्धतशीरपणे केलेले षडयंत्र आहे. हिंदुत्वाचे कार्य प्रामाणिकपणे करणार्यांची ही गळचेपी आहे. ही अटक अन्यायकारक आहे. पुनाळेकर निर्दोष असून त्यांची तत्काळ सुटका करण्यात यावी.’’ अशी मागणी सनातन संस्थेच्या वैद्या दिक्षा पेंडभाजे यांनी आंदोलनाच्या वेळी केली.
- या वेळी करण्यात आलेल्या मागण्या
१. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणातील सी.बी.आय.च्या भूमिकेचाही तपास करण्यात यावा.
२. सी.बी.आय.चे अधिकारी नंदकुमार नायर यांच्याकडून डॉ. दाभोलकर प्रकरणाचा तपास काढून तो अन्य निष्पक्ष अधिकार्याकडे सोपवण्यात यावा अथवा तो तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावा.