हाजुरी, लुईसवाडी परिसरातील नागरिकांना आजपासून मिळणार प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी

म विजय

ठाणे दि.०३ – ठाणे महानगरपालिकेच्यावतीने बृहन्मंबई महापालिकेच्या माध्यमातून हाजुरी, लुईसवाडी आणि परिसरात पुरविण्यात येणा-या प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा बंद करून शुद्ध पाणी पुरवठा करणेचा कामाचा लोकार्पण समारंभ आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम),सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री मा ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व महापौर सौ.मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आज पासून हाजुरी , लुईसवाडी, रामचंद्र नगर , काजुवाडी , रघुनाथनगर , अंबिका नगरचा काही भाग व नामदेववाडी या परिसरातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

हेही वाचा :- दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा बंद करण्याचे आदेश

या समारंभाला उप महापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे,  सभागृह नेते नरेश म्हस्के, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक संदीप लेले,  भाजपा गटनेते नारायण पवार, जेष्ठ नगरसेवक अशोक वैती, नगरसेवक संतोष वडवले, अशोक राऊळ,परिवहन समिती सदस्य राजेश मोरे,नगरसेविका रुचिता मोरे, साधना जोशी, नंदिनी विचारे, प्रभा बोरीटकर, निर्मला कणसे, शिल्पा वाघ, माजी नगरसेविका नम्रता भोसले आदी उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडील प्रक्रिया न केलेल्या ३० दश लक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठ्यापैकी हाजुरी येथील संयोजनाद्वारे ठाणे महानगरपालिकेस २२ . ५ दश लक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा सुमारे ३० वर्षापासून मिळत होता.  प्रक्रिया न केलेला पाणी पुरवठा हा हाजुरी , लुईसवाडी, रामचंद्र नगर , काजुवाडी , रघुनाथनगर , अंबिका नगरचा काही भाग व नामदेववाडी या भागातील सुमारे १.०० लक्ष लोकसंख्येस होत होता.

हेही वाचा :- महासभेत राडा होऊ शकतो या ‘इनपुट’ने पोलिसांचा अलर्ट, नगरसेवकांच्या गाडया केल्या चेक

सदरचा  पाणी पुरवठा हा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून फक्त क्लोरीनेशन करून नागरिकांना पुरवठा करण्यात येत होता. या पाणी पुरवठ्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसांत गढूळपणा वाढल्याने  नागरिकांच्या पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या.याबाबत  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने नवीन जलजोडणी आकार आणि अनामत म्हणून 3 कोटी 16 लक्ष रूपयांची अनामत रक्कमही भरण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेने सर्व्हिस रोड व धर्मवीर मार्ग या जंक्शनवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शुध्द पाण्याचे कनेक्शन उपलब्ध करून घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या जलवाहिनीस जोडलेले आहे. सदर जोडणी केलेल्या जलवाहिनीतून २२.५ दश लक्ष लिटर  प्रतिदिन पाणी पुरवठा हा हाजुरी, लुईसवाडी, रामचंद्र नगर, काजुवाडी, पूनाथ नगर, अंबिका नगरचा काही भाग व नामदेववाडी भागास होणार असून  सुमारे १.०० लक्ष लोकसंख्येस प्रक्रिया केलेले शुध्द पाणी आजपासून मिळणार आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email