वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ शो रुम बाहेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

 

*‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची क्षमा मागून ‘कन्यादाना’ विषयी आक्षेपार्ह जाहिरात मागे घ्या -* हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावनी

‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या कंपनीच्या ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडने हिंदूंच्या विवाह संस्कारातील ‘कन्यादान’ नको, तर ‘कन्यामान’ म्हणा’, असा धार्मिक कृतींविषयी अपप्रचार करणारी जाहिरात अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. या जाहिरातीमुळे व्यापक आणि उच्च मूल्य जोपासणार्‍या धार्मिक विधीविषयी लोकांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटना या जाहिरातीचा निषेध करण्यासाठी आम्ही निदर्शने केली आहेत. वेदांत फॅशन्स लि. कंपनीने हिंदूंची बिनशर्त क्षमा मागून ‘मान्यवर’ ब्रँडची ही जाहिरात त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी या वेळी केली. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आज वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ शो रूम समोर निदर्शने केली, त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह हिंदू धर्मप्रेमींंनी हातात निषेध फलक धरून लोकांमध्ये जागृती केली. ही जाहिरात मागे घेऊन जोपर्यंत क्षमा मागत नाही, तोपर्यंत हिंंदु समाजाने ‘मान्यवर’ ब्रँडवर बहिष्कार घालावा, असे आवाहनही या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले.

‘मान्यवर’ने प्रसारीत केलेल्या जाहिरातीतून हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केले असून ‘कन्यादान’ कसे चुकीचे आहे, प्रतिगामी आहे, तसेच ‘दान करायला कन्या वस्तू आहे का ?’, असे संभ्रम निर्माण करणारे प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. ‘कन्यादान’ नको, तर कन्यामान’, असा थेट परंपरा बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुळात अन्य कोणत्याही धर्मात स्त्रियांना सन्मान दिला जात नाही, याउलट आदिशक्ती म्हणून स्त्रीची पूजा केली जाते. असे असतांना त्याविषयी चुकीचा संदेश पसरवणार्‍या वेदांत फॅशन्स लि. कंपनीनेे अन्य धर्मातील महिलांविषयी चुकीच्या प्रथा-परंपरांविषयी प्रबोधन करणारी जाहिरात काढण्याची हिंमत करून दाखवावी. ‘मान्यवर’ ब्रँडची जाहिरात मागे न घेतल्यास यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असेही डॉ. धुरी यावेळी म्हणाले.

 

Hits: 0

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email