अजित पवारांनी दिलेले सर्व कागदपत्रे उद्या सादर करा; कोर्टाचे आदेश
(म.विजय)
मुंबई दि.२४ :- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घटनेनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती.
हेही वाचा :- अजित पवारांनी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक केली : संजय राऊत
मात्र याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेते सुप्रीम कोर्टात गेले आहे. यावर आज रविवारी २४ रोजी तातडीने सुनावणी घेण्यात आली. युक्तिवाद पूर्ण झाला असून राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी केलेल्या प्रक्रियेची कागदपत्रे उद्या १०:३० वाजेपर्यंत सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहे.
Please follow and like us: