डोंबिवली ; काचबिंदूच्या जनजागृतीसाठी १० तारखेला प्रभातफेरी
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०६ – काचबिंदू हा चोर पावलाने येणारा आजार असून वेळीच उपचार केले नाही तर तर पूर्णपणे अंधत्व येऊ शकते. लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी गोपाल कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट व अनिल आय हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 10 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता प्रभात फेरी आयोजित करण्यात आली आहे. राज्याच्या 36 जिल्हयातून एकाच वेळी, एकाच दिवशी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात येणार असून जनजागृती व दृष्टी वाचविण्याच्या कार्यात नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. अनघा हेरुर यांनी केले आहे.
हेही वाचा :- विशेष मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात १५ हजार नवीन मतदार नोंदणी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी दिली विविध मतदान केंद्रांना भेट
याबाबत डॉ. हेरुर यांनी सांगितले कि, काचबिंदू आजारात डोळ्यांचे प्रेशर वाढते त्यामुळे डोळ्यांच्या नसेवर कायमचा परिणाम होतो. सुरवातीला आजूबाजूची दृष्टी कमी होते व वेळीच उपचार केले नाही तर अंधत्व येऊ शकते. यासाठी काचबिंदू जनजागृती म्हणून 10 ते 16 मार्च कालावधीत डोळ्यावर मोफत उपचार करून हा काचबिंदू दिन साजरा करण्यात येणार आहे. 10 मार्च हा जागतिक काचबिंदू दिन असल्याने या दिवशी डोंबिवलीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रभात फेरी सुरु होणार असून प्रभात फेरीचा शेवट फडके पथावर हेरुर हॉस्पीटलजवळ करण्यात येणार आहे. काचबिंदू जनजागृतीसाठी व दृष्टी वाचवण्यासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. अनघा हेरुर यांनी केले आहे.