स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अंदमानोत्तर कार्य चार खंडात नव्याने प्रकाशित होणार
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अंदमानातून सुटका झाल्यानंतर रत्नागिरीतील स्थानबद्धतेपासून ते आत्मार्पणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या सर्वांगीण कार्याची इत्यंभूत माहिती देणारी बाळाराव सावरकर यांनी लिहिलेली चार खंडांची ग्रंथसंपदा पुनर्मुद्रित होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
हेही वाचा :- ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव कुलकर्णी यांचे निधन
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या १९२४ ते १९६६ अशा चार दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीला शब्दबद्ध करण्याचे शिवधनुष्य बाळाराव सावरकर यांनी समर्थपणे पेलले. स्वातंत्र्यवीरांच्या अविरत कार्याचे प्रत्येक क्षण न् क्षण त्यांनी अचूकपणे टिपले असून संपूर्ण इतिहास जिवंतपणे सादर केला आहे.
हेही वाचा :- Kalyan ; दोन तडीपार अटकेत
भूतकाळ असो वा वर्तमान, प्रत्येक कालखंडात सावरकरांच्या वैचारिक विरोधकांवर प्रतिहल्ला करण्यासाठी हे साहित्य वेगवेगळ्या प्रसंगी प्रभावी शस्त्र ठरले आहे. सुमारे दोन हजार पानांचे हे लिखाण रत्नागिरी पर्व, हिंदू महासभा पर्व, अखंड हिंदुस्थान पर्व आणि सांगता पर्व अशा चार भागांमध्ये विभागण्यात आले आहे. चारही खंडातील प्रत्येक विधान साधार असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतः जपून ठेवलेली कात्रणे, लेख, पत्रके, पत्र यांचा उपयोग बाळाराव सावरकर यांनी अत्यंत परिणामकारकपणे सादर केला आहे.
हेही वाचा :- मोबाईल चोराची धुलाई
तात्यारावांच्या आत्मार्पणानंतर सहा वर्षांनी म्हणजे १९७२ मध्ये याचे प्रकाशन करण्यात आले होते. तब्बल ४८ वर्षानंतर या चारही खंडाचे पुनर्प्रकाशन होत असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. संचाची आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे.