“दहा रुपयांच्या थाळी सोबत वीस रुपयांची बिसलरी पिणारे गरीब माणूस”
मुंबई दि.२७ – रविवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ठाकरे सरकारच्या १० रुपयात शिवथाळी योजनेचा शुभारंभ करण्यात आले. मनिषा नगर येथील नागरिकांसाठी शिवभोजन योजनेचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.
आज मनीषा नगर येथील नागरिकांसाठी "शिवभोजन" योजनेचे उदघाटन केले व मी स्वतः भोजनाचा स्वाद घेतला.
गरीब व गरजू जनतेला फक्त दहा रुपयात दर्जेदार आहार भेटावं. हेच आमच्या महाविकास आघाडी सरकारचे उद्दिष्ट आहे.@OfficeofUT @PawarSpeaks @CMOMaharashtra pic.twitter.com/YUNBUyrzCQ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 26, 2020
हेही वाचा – शिवभोजन थाळी पहिल्याच दिवशी दहा हजार थाळी विक्री…
उद्घाटन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी शिवथाळीचा आस्वाद घेतला. तर यावरून मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. “दहा रुपयांच्या थाळी सोबत वीस रुपयांची बिसलरी पिणारे गरीब माणूस” असा खोचक टोला खोपकर यांनी यावेळी लगावला.
१० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस ! 😢 pic.twitter.com/kmuCGq3PfX
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 27, 2020