पेट्रोल पंपावरील १२ लाखांची रोकड लुटणाऱ्या संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

( बालकृष्ण मोरे )

कल्याण दि.०२ – कल्याणच्या मुरबाड रोडवरील रोशन पेट्रोल पंपाची बॅंकेत भरायला नेण्यात येत असलेली रोकड लुटण्यात आली होती. रोशन पेट्रोलचा मॅनेजर हा सदर रक्कम व काही चेक बॅंकेत भरण्यास घेऊन चालले असता ती मोटार सायकलहून आलेल्या तीन इसमानी लुटल्याचा माहिती या वेळी रोशन पेट्रोल पंपाच्या मॅनेजरने देत महात्मा फुले चौक पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत १२ लाखांची रोख रक्कम व काही चेक १६ लाख ४० हजाराची रक्कम लुटण्यात आल्याचे सांगितले गेले होते. या बाबत महात्मा फुले चौक येथे रोशन पेट्रोल पंपाचे मॅनेजर प्रदीप सिंग याने तक्रार नोंदविली असता पोलिस तपासाला लागले होते.

पोलिसांनी या बाबत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. महात्मा फुले चौक पोलिसांचे म्हनणे आहे की या बाबत तपास सुरू आहे. ३१ मेला रोशन पेट्रोल पंपाचा मॅनेजर प्रदीप सिंह यांच्या फियादी नुसार पंपाची रोख रक्कम व चेक बॅंकेत भरण्यासाठी तो घेऊन निघाले असता पेट्रोल पंपाच्या काही ५० मीटर अंतरावरच मोटार सायकल वरून तीन जण आले होते.यातील एकाने मॅनेजर प्रदीप सिंह यांना लाथेने मारून तर एकाने हातावर दांडा मारून ही रोख रक्कम व चेक असलेली बँग पळविली होती. या रोख लुटण्याच्या संदर्भात महात्मा फुले पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्ष दायमा यांना विचारले असता तापस सुरू असून तापस पूर्ण झाल्यावरच माहिती देण्यात येईल असे त्यांनी सांगितले . या मुळे या प्रकारणातील तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात असल्याचे गोष्टीला पुष्टी मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.