सेऊलमध्ये योनसेई विद्यापीठात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
नवी दिल्ली, दि.२१ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेऊलमध्ये योनसेई विद्यापीठात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले. प्रजासत्ताक कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन आणि प्रथम महिला किम जुंग सूक आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस बान की मून उपस्थित होते. योनसेई विद्यापीठात बापूंच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करणे हा मोठा सन्मान असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगिले. बापूंच्या 150व्या जयंतीवर्षात हे अनावरण होत आहे, हे आणखी विशेष असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
हेही वाचा :- स्टार्ट अप उपक्रमासंदर्भात डीपीआयआयटीकडून राज्य क्रमवारीसाठी सुरुवात
दहशतवाद आणि हवामान बदल या मानवतेपुढे असलेल्या सध्याच्या दोन आव्हानांवर मात करण्यात बापूंचे विचार आणि आदर्श आपल्याला साहाय्यकारी ठरतील, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या जीवनशैलीतून बापूंनी निसर्गासोबत कसे राहायचे आणि कशाप्रकारे आपण कार्बन उत्सर्जन कमी करु शकतो ते दाखवून दिले आहे. आपल्या पुढल्या पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हरित वसुंधरेचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी दर्शवले आहे. योनसेई विद्यापीठ हे दक्षिण कोरियातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या विद्यापीठांपैकी एक आहे. दक्षिण कोरियाने जागतिक शांतीचे प्रतिक म्हणून महात्मा गांधींचा सन्मान केला आहे.