पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जून 2018 रोजी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत.
इंदौरमध्ये होणाऱ्या मध्य प्रदेश शहरी विकास महोत्सवाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या 4 हजार कोटी रुपयांहून अधिक मुल्याच्या विविध शहर विकास प्रकल्पांचे रिमोटद्वारे उद्घाटन करणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, शहरी पेयजल पुरवठा योजना, शहरी घनकचरा व्यवस्थापन, शहरी स्वच्छता, शहरी वाहतूक, शहर सौंदर्यीकरण योजनांचा यात समावेश आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2018चे पुरस्कारही ते वितरीत करतील आणि स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या निकालांच्या डॅशबोर्डचा शुभारंभ करतील. सर्वात स्वच्छ शहरे आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांना पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येतील. स्वच्छ संशोधन, स्वच्छ सर्वोत्तम पद्धती आणि स्वच्छ उद्योजक यांनाही पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार दिले जातील.
तत्पूर्वी राजगड येथे पंतप्रधान मोहनपूरा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पामुळे राजगड जिल्ह्यातील शेत जमिनींना सिंचन सुविधा उपलब्ध होईल. तसेच या परिसरातील गावांना यामुळे पिण्याचे पाणी मिळेल. विविध पेयजल योजनांची पायाभरणी पंतप्रधान करतील.