कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांची जवानांना आदरांजली
नवी दिल्ली, दि.२७ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनानिमित्त जवानांना आदरांजली अर्पण केली आहे.
“कारगिल विजय दिनी ऑपरेशन विजय दरम्यान देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या सर्वांना हा देश कृतज्ञतापूर्वक आदरांजली अर्पण करत आहे. आपला भारत सुरक्षित रहावा याची खातरजमा आमच्या शूर सैनिकांनी केली आणि आमच्या देशातील शांततेचे वातावरण कलुषित करु इच्छिणाऱ्यांना चोख उत्तर दिले” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Please follow and like us: