मिशन शक्ती मधल्या वैज्ञानिकांशी पंतप्रधानांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद
नवी दिल्ली, दि.२७ – मिशन शक्ती यशस्वी करणाऱ्या वैज्ञानिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मिशन शक्ती यशस्वीपणे पार पडल्यामुळे ॲन्टी सॅटेलाईट मिसाईल अर्थात उपग्रह भेदी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रहाला यशस्वीरित्या लक्ष्य करण्याची क्षमता बाळगणारा भारत हा जगातला चौथा देश ठरला आहे. या यशाबद्दल अभिनंदन! वैज्ञानिकांनी जे उद्दिष्ट ठेवले होते.
ते यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या आपल्या वैज्ञानिकांचा संपूर्ण राष्ट्राला अभिमान आहे. वसुधैव कुटुंबकम अर्थात हे विश्वची माझे घर, हे तत्वज्ञान भारत अनुसरतो. मात्र शांतता आणि सद्भावनेसाठी काम करणाऱ्या शक्ती, शांतता प्राप्तीसाठी सदैव शक्तीशाली रहायला हव्यात यावर त्यांनी भर दिला. वैश्विक आणि क्षेत्रीय शांततेसाठी भारत सक्षम आणि मजबूत हवा. यासाठीच्या प्रयत्नात आपल्या वैज्ञानिकांनी निष्ठेने योगदान दिले आहे. संपूर्ण मंत्रिमंडळातर्फे त्यांनी वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या.