भारतरत्न पुरस्काराच्या मानकऱ्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
नवी दिल्ली, दि.२७ – यंदा भारतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या मानकऱ्यांचे अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नानाजी देशमुख यांच्या कार्याचे कौतुक करतांना पंतप्रधान म्हणाले,”ग्रामविकासाच्या क्षेत्रात नानाजी देशमुख यांच्या अतुल्य कर्तृत्वातून ग्रामीण जनतेच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवण्याची प्रेरणा आणि शिकवण आपलयाला मिळते. मानवता, दया आणि वंचितांच्या प्रति सेवाभावाचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. ते खऱ्या अर्थाने भारतरत्न आहेत.
हेही वाचा :- तंत्रज्ञान विषयक वस्त्रोद्योगाशी संबंधित राष्ट्रीय परिषदेचे मुंबईत आयोजन
“भूपेन हजारिका यांची गाणी आणि संगीत पिढ्यानपिढ्या रसिकांना आनंद देत आहे. या संगीतातून न्याय, सौहार्द आणि बंधुभावाची शिकवण जगाला मिळते. भारतीय संगीताची परंपरा त्यांनी जगभरात लोकप्रिय केली. भूपेनद यांचा भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान होतांना बघून आनंद होत आहे.” प्रणब मुखर्जी यांच्याविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले, “प्रणवदा हे सध्याच्या काळातले सर्वोत्तम मुत्सद्दी राजनीतिज्ञ आहेत. त्यांनी अनेक दशके निस्वार्थ भावनेने अथकपणे देशाची सेवा केली आहे. देशाच्या विकासाच्या वाटचालीत त्यांनी आपला अमीट ठसा उमटवला आहे. त्यांची बुद्धीमत्ता आणि शहाणपण याची क्वचितच कोणाशी तुलना करता येईल. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होतांना बघून अतिशय समाधान वाटते आहेत.”