कादर खान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली, दि.०१ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कादर खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या संपन्न अभिनयाने, कादर खान यांनी सिनेक्षेत्र उजळलं आहे, त्यांची विनोदबुद्धीही अद्वितीय होती. उत्तम संवादलेखक असलेले कादर खान अनेक संस्मरणीय चित्रपटांशी जोडलेले आहेत. त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.
हेही वाचा :- नववर्षानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
Please follow and like us: