सराईत गुन्हेगाराला पिस्तल तीन काडतुसासह अटक
कल्याण पूर्वेत गस्ती दरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे रवी दाढी असे या गुन्हेगाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत रवी दाढी विरोधात कोल्शेवाडी पोलीस स्थानकासह खडकपाडा पोलीस स्थानकात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारांचा वाढता वावर पोलिसांची डोकेदुखी ठरू लागली आहे.
एका तरुणाला गावठी कट्यासह अटक करण्यात आल्याची घटना ताजी असताना पुन्हा सराईत गुन्हेगार रवी दाढी याला देखील कल्याण पूर्व परिसरातून अटक करण्यात आली आहे.लोकसभा निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते .या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांची माहिती मिळवत कारवाई सुरु केली आहे .काल पहाटेच्या सुमारास कोलशेवाडी पोलीसाचे पथक कल्याण पूर्व परिसरात गस्ती घालत असताना विजय नगर पूजा कोप्लेक्स साई बाबा मंदिरा समोरील मैदानात रवी दाढी हा पिस्टल सारखे हत्यार घेवून गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने उभा असल्याची माहिती पोलीसान मिळाली .पोलिसांच्या पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत सापळा रचत रवी दाढीला अटक केली त्याच्याकडून एक देशी पिस्टल व तीन जीवात काडतूस हस्तगत केले .रवी या परिसरात नेमक्या कोणत्या उद्देशाने आला होता याचा तपास पोलीस करत आहेत