सशस्त्र दलांमध्ये महिलांना परमनंट कमिशन

नवी दिल्ली, दि.०६ – सशस्त्र दलांमध्ये महिलांना परमनंट कमिशन देण्यासंदर्भत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी संरक्षण मंत्रालयाने पावले उचलली आहेत. भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिकासह सर्व विभाग महिला अधिकाऱ्यांसाठी खुले आहेत.

हेहि वाचा :- साहेब’ परतले आणि सारे आलबेल झाले…

भारतीय नौदलात समुद्रावर कार्यरत नसणारे सर्व विभाग शॉर्ट टर्म कमिशनच्या माध्यमातून महिला अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी खुले करण्यात आले आहेत. शिक्षण, कायदा आणि नौदल शाखेसह शॉर्ट टर्म कमिशन महिला अधिकाऱ्यांना नौदलाच्या विभागात पुरुष अधिकाऱ्यांप्रमाणेच परमनंट कमिशनसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. नौदलाच्या प्रस्तावित तीन नव्या प्रशिक्षण जहाजांवर महिला आणि पुरुष अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. लष्कराच्या ज्या सर्व दहा विभागात महिलांना शॉर्ट टर्म कमिशन देण्यात आले आहे, त्या सर्व ठिकाणी महिलांना परमनंट कमिशन देण्यात येणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email