पेण ; वीज खांबावरून एलुमिनिअमच्या तारा चोरणाऱ्या चोरांविरुद्ध गुन्हा दाखल
(म.विजय)
भांडूप दि.०८ :- महावितरणच्या पेण ग्रामीण भागात येत असलेल्या तरणखोप हद्धीतील वीज खांबावरून एलुमिनिअमच्या तारा चोरणाऱ्या अज्ञात चोरांविरोधात पेण पोलीस ठाण्यात दि. ०५.१२.२०१९ रोजी भारतीय दंड साहिंता १८६० अंतर्गत कलम 379 (एफ.आय. आर क्र. ०१९५) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :- ठाण्याच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा
या प्रकरणात, दि. ३.१२.२०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता चे सुमारास पेण ग्रामीण शाखातील प्रधान तंत्रज्ञ सी.आर.फसाळे, वरिष्ट तंत्रज्ञ श्री.एच.पी.मोकल हे इरवाडी ते कोप्रोली या भागात दैनंदिन कामासाठी गेले असता तरणखोप हद्दीतील मिलन हॉटेलच्या पाठीमागे रेल्वे रूळाचे पलीकडे असलेल्या लघुदाब वाहिनीच्या खांबावरील तारा कटरच्या सहाय्याने कापून अज्ञात चोराने चोरून नेले आहे असे आढळले. प्रधान तंत्रज्ञ श्री.सी.आर.फसाळे, वरिष्ट तंत्रज्ञ श्री.एच.पी.मोकल यांनी याबाबत महावितरणच्या पेण ग्रामीण शाखाचे सहाय्यक अभियंता श्री. अभिषेक थोरात यांना कळविले.
हेही वाचा :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्यात स्वागत
थोरात यांनी घटनास्थळी जाऊन समक्ष पाहणी केली तेव्हा त्या परिसरातील १८ लघुदाब वाहिनीच्या खांबावरील अंदाजे रु ६०,००० किमतीचे तारा कटरच्या सहाय्याने कापून अज्ञात चोराने चोरून नेले आहे याची खात्री झाल्याने कार्यवाही करण्याच्या दृष्टीने थोरात यांनी त्वरित पेण पोलीस ठाण्यात तक्रार करून एफ.आय. आर. दाखल केले. या प्रकरणी पेण पोलीस पुढील तपास करीत आहे. या चोरांमुळे वीज खंडीत होण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांची गैरसोय होते तसेच वीज कर्मचाऱ्यांनाही काम करण्यास अडचणीला सामोरे जावे लागते.