पीक कर्ज न मिळाल्याने हृदय विकाराच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू

परभणी दि.१९ :- जिल्ह्यातील 65 वर्षीय शेतकऱ्याला पीक कर्ज न मिळाल्याने हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भीमराव चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जिल्ह्यातील 4 गावांना कर्जमाफी मिळत नसल्याने काही शेतकरी उपोषणाला बसले आहेत. भीमराव चव्हाण हे पाथरी तालुक्यातील देवेगाव या ठिकाणचे रहिवाशी होते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. भीमराव गेल्या काही दिवसांपासून पाथरीच्या SBI बँकेत पीक कर्जासाठी चकरा मारत होते.

हेही वाचा :- जलसंवर्धन आणि एकदा वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर न करणे ही लोकचळवळ बनावी-उपराष्ट्रपती

मात्र त्यांना पीक कर्ज न मिळाल्याने ते तणावाखाली होते. यामुळे आज अचानक त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना पाथरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी चव्हाण यांना मृत घोषित केले. यानंतर संतप्त झालेल्या चव्हाण कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह पाथरी येथील SBI बँकेतील शाखेत नेऊन ठेवला.

हेही वाचा :- ‘आरे’तील 2700 झाडांच्या कत्तलीविरोधात युवासेनेनंतर मनसेचे अमित ठाकरे आरेच्या मैदानात

बँक व्यवस्थापनाच्या वेळ खाऊ धोरणामुळे चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यानंतर कुटुंबियांनी बँका व्यवस्थापनाच्या कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच बँक परिसरात गावातील शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान चव्हाण कुटुंबियांनी नातेवाईकांना बँक व्यवस्थापनला यासाठी दोषी धरले आहे.

डोंबिवलीकरांना कुणी रस्ता देता का रस्ता ?
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email