पराक्रम पर्व उत्सव

नवी दिल्ली, दि.२५ – भारतीय सैन्याचा पराक्रम नेहमीच देशाची मान उंचावणारा ठरला आहे. युद्ध आणि शांतता काळात सैन्याचे योगदान पूर्ण देशासाठी महत्वाचे आहे. भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाचा गौरव म्हणून आपण अनेक लढायांचे स्मरण दिवस साजरे करत असतो.

भारतीय सैन्याने 2016 साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जीकल हल्ले करुन असाच पराक्रम गाजवला होता. या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी आणि भारतीय सैनिकांच्या धैर्याला वंदन करण्यासाठी 28 ते 30 सप्टेंबर 2018 या काळात देशभर “पराक्रम पर्व” साजरे केले जाणार आहे. या निमित्त नवी दिल्लीतील राजपथावर मुख्य कार्यक्रम होईल. त्याशिवाय 51 शहरातल्या 53 ठिकाणी भारतीय सैन्याचे शौर्य दाखवणाऱ्या विविध घटना आणि कार्यक्रम केले जातील.

28 सप्टेंबरला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या पराक्रम पर्वाचे उद्‌घाटन होईल. यावेळी या विद्यार्थ्यांशीही संवाद साधतील. सैनिकांच्या शौर्य गाथा सांगणारे चित्रपट आणि फोटो यावेळी दाखवले जातील. विद्यार्थ्यांनी सैनिकांना लिहिलेल्या पत्रांचे प्रदर्शनही भरवले जाईल. जम्मू आणि काश्मीरमधून दहशतवाद्यांकडून हस्तगत केलेली शस्त्रे देखील यावेळी सर्वसामान्यांना बघता येतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email