गुढीपाडवा निमित्त शोभायात्रेचे आयोजन.
उरण दि.३१ – महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाशी सलंग्न असलेल्या उरण मधील उरण जेष्ठ नागरिक मंडळ उरण(रायगड)या जेष्ठ नागरीकांच्या संस्थेतर्फे दरवर्षी गुढीपाडव्याला शोभायात्रेचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उरण जेष्ठ नागरिक मंडळातर्फे शनिवार दि 6/4/2019 रोजी सकाळी 8:30 वाजता पेंशनर्स पार्क उरण शहर येथे गुढीपाडव्याचे औचित्य साधून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी या शोभायात्रेत सर्व राजकीय पक्ष,सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, भजनी मंडळे, महिला मंडळे सहभागी होत असतात. याहीवर्षी असा सहभाग शोभायात्रेत असणार आहे. उरण शहरात निघणा-या शोभायात्रेत जास्तीत जास्त नागरीकांनी, विविध संस्था, संघटनानी सहभागी व्हावे असे आवाहन उरण जेष्ठ नागरिक मंडळ उरण तर्फे करण्यात आले आहे.
Please follow and like us: