अ.भा.वि.प कोंकण प्रांत अभ्यासवर्गाचे आयोजन


कल्याण दि.३१ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कल्याण जिल्ह्याच्यावतीने प्रांत अभ्यासवर्गाचेे आयोजन 4 ते 7 जून या कालावधीत केले गेले आहे. कल्याण मुरबाड रोड येथील मेरिडियन स्कुल, कांबा येथे होणाऱ्या ह्या अभ्यासवर्गात कोंकण प्रांतातून सुमारे ३०० विद्यार्थी तसेच केंद्रीय आणि प्रांत पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

अ.भा.वि. प. गेल्या ७० वर्षांपासून शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहे. अ. भा.वि.प. च्या कार्यपद्धतीचा महत्वाचा टप्पा म्हणजे कार्यकर्त्यांसाठीचा अभ्यासवर्ग होय. ह्या अभ्यासवर्गात कार्यकर्ता प्रशिक्षण, सामाजिक कार्य कसे करावे, लीडरशिप, आदिबाबत मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती अ. भा.वि.प. ठाणे विभाग प्रमुख वरदराज बापट आणि कल्याण शहर मंत्री यांनी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email