डोंबिवली ; जागतिक कॅन्सर डे निमित्त “उम्मीद” चे आयोजन !
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०१ – कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे प्रमाण वाढत असताना या आजाराची बाधा झालेले रुग्ण मानसिकदृष्ट्या खचून जातात यामुळेच अशा रुग्णाचे मनोबल उंचावण्यासाठी आणि या दुर्धर आजाराचा यशस्वी सामना करणे शक्य असल्याचा विश्वास त्यांना देण्यासाठी डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाच्या वतीने जागतिक कॅन्सर डे च्या निमित्ताने ४ फेब्रुवारी रोजी उम्मीद २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली जिमखान्यातील तिस-या मजल्यावर दुपारी ३ ते ७ या वेळेत होणा-या या कार्यक्रमाला डॉ श्रीकांत शिंदे आणि महापौर विनिता राणे उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा :-
विशेष म्हणजे या कार्यक्रमात कॅन्सर या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्ती त्यांचे अनुभव आणि त्यांनी या आजाराशी दिलेला यशस्वी लढा सांगणार असून यामुळे आता या आजाराशी लढणाऱ्या व्यक्तींचा हुरूप निश्चितच वाढेल आणि त्याना या आजाराशी लढण्यासाठी बळ मिळेल असा विश्वास एम्स रुग्णालयात प्रशासनाच्या वतीने डॉ मिलिंद शिरोडकर यांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना मानसिक बळ द्यावे असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.