30 वर्षांतरच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आयुक्तांचे आदेश

डोंबिवली दि.०७ – ३० वर्षे किंवा त्‍यापेक्षा जास्‍त जुन्‍या इमारतींचे स्‍ट्रक्‍चरल ऑडीट करण्‍याचे आदेश आयुक्‍त गोविंद बोडके यांनी आज दिले आयुक्‍तांनी सर्व प्रभाग क्षेञ अधिका-यांना त्‍यांचे प्रभाग क्षेञा अंतर्गत असलेल्‍या ३० वर्षे किंवा त्‍यापेक्षा जास्‍त जुन्‍या इमारतींचे मालक, भोगवटादार, गृहनिर्माण सहकारी संस्‍थांचे चेअरमन यांना त्‍यांच्‍या प्रभाग कार्यालयामार्फत नोटिसा बजावण्‍यात याव्‍यात असे निर्देश दिलेत. महाराष्‍ट्र महापालिका अधिनियमातील कलम २६५ (अ) मध्‍ये इमारतीच्‍या भोगवटा करण्‍यास परवानगी दिल्‍याच्‍या दिनांकापासून किंवा तिच्‍या बांधकाम क्षेञाच्‍या किमान ५० टक्‍के इतक्‍या क्षेञाचा प्रत्‍यक्ष भोगवटा केल्‍याच्‍या तारखेपासून यापैकी जो आधीचा असेल, त्‍या दिनांकापासून ३० वर्षाचा कालावधी समाप्‍त झाला असेल, अशा इमारतीचा मालक किंवा भोगवटादार, इमारत मानवी वस्‍तीसाठी राहण्‍यायोग्‍य असल्‍याचे *’बांधकाम सुस्थिती प्रमाणपञ ‘

हेही वाचा :- Dombivli ; केडीएमसी हद्दीतील तब्बल ३७८ इमारती धोकादायक! केडीएमसी आयुक्तांनी घेतला आढावा

महापालिकेकडे नोंदणी केलेल्‍या बांधकाम अभियंत्‍याकडून प्राप्‍त करुन घ्‍यावे. त्‍याअनुषंगाने अशा इमारतधारकांनी तातडीने संबधित अभियंत्‍याकडुन स्‍ट्रक्‍चरल ऑडीट करुन घ्‍यावे. जर का पावसाळयात अशा इमारतींची पडझड झाल्‍यास त्‍यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. गतवर्षी महापालिका क्षेञात धोकादायक २१० आणि अतिधोकादायक १६८ असे एकूण ३७८ इमारती असल्‍याचे जाहीर केले होते. सर्वात जास्‍त १२२ धोकादायक इमारती प्रभाग क्षेञ फ मध्‍ये तर, अतिधोकादायक ९१ इमारती क प्रभाग क्षेञ कार्यालया अंतर्गत आहेत. अशा इमारतींमधील रहिवाशांना देखिल आवाहन करण्‍यात येते की, त्‍यांनी पावसाळयापूर्वी स्‍थलांतरित व्‍हावे, जेणेकरुन कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घ्‍यावी. असे आवाहन आयुक्त गोविद बोडके यांनी केले आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email