एकतर्फी प्रेमातून तरुणाचा तरुणीसमोर गोळीबार ; सुदैवाने कुणीही जखमी नाही
पुणे दि.०२ :- एकतर्फी प्रेमातून जुन्नर तालुक्यात एका तरुणाने तरुणीसमोर गोळीबार केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. यात सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही. या प्रकारानंतर पोलिसांनी दोन तासांच्या पाठलागानंतर आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. अक्षय भाऊसाहेब दंडवते ( वय २३, रा. खेड) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा :- हिंदुत्वाची कास धरणारा मनसे हा पक्ष आपला नवा मित्र…
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय याचं एका तरुणीवर त्याचं एकतर्फी प्रेम होतं आणि तिच्यासोबत त्याला लग्न करायचे होतं. म्हणूनच रविवारी (१ मार्च) खेडमधून तो जुन्नर तालुक्यातील येडगावमध्ये आला. जांबूत फाट्याजवळ तरुणी नातेवाईकाची वाट पाहत होती. त्याचवेळी अक्षय तिथे आला, तेवड्यात नातेवाईकही (तरुणीला)तिला घ्यायला पोहोचले. तरुणी नातेवाईकांच्या गाडीवर बसताच अक्षयने बंदूक बाहेर काढली.
हेही वाचा :- वाहतूक पोलीस विलास शिंदेंची हत्या करणाऱ्या अहमद कुरेशीला जन्मठेपेची शिक्षा
‘घरच्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करुन तू माझ्याशी लग्न कर’ असा हट्ट तरुणीकडे अक्षयने धरला. तिने त्याला निघून जायला सांगितले. तेव्हा अक्षयने तिचा हात धरला. यावेळी तिच्या नातेवाईकाने अक्षयला समजवण्याचा प्रयत्न केला. पण, तो समजून न घेता मारेन-मारेन असे म्हणू लागला. तरीही तरुणीने नकार कायम ठेवला, त्यामुळे संतापलेल्या अक्षयने बंदुकीतून जमिनीवर एक गोळी झाडली. यात कोणीही जखमी झाले नाही. त्यानंतर अक्षयने तेथून पळ काढला. हा प्रकार पोलिसांना समजतात त्यांनी अक्षयचा पाठलाग करून त्याला पकडले.