बस पकडण्यासाठी जात असताना बसच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू

Hits: 0

मुरबाड दि.१२ :- बस पकडण्यासाठी जात असताना बसच्या चाकाखाली येऊन एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. शहापूर वरून मुरबाड आगारात प्रवेश करणारी (एमएच २० बीएल ०९८६) एसटी बस भरधाव वेगाने सुदाम भालेराव (अंदाजे वय ५५) यांच्या अंगावरून गेली. सुदाम हे मुरबाड तालुक्यातील विढे गावचे रहिवासी असून सध्या उल्हासनगर येथे नोकरी निमित्त राहत होते.

हेही वाचा :- भिमा-कोरेगावसह मराठा मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेतल्यास…

भालेराव हे मुरबाड बस आगारात बस पकडण्यासाठी जात असताना त्याच सुमाराला शहापूर वरून मुरबाड आगारात प्रवेश करणारी एसटी बस भरधाव वेगाने भालेराव यांच्या अंगावरून गेली. यावेळी बसच्या चाकाखाली चिरडून सुदाम भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला. सुदाम मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुरबाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी पाठवला आहे. अपघाताची नोंद मुरबाड पोलीस ठाण्यात करण्यात आली. अधिक तपास मुरबाड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.