जागतिक कर्करोग दिनानिमित्त एम्स रुग्णालयाच्या मदतीने कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा मेळावा…

डोंबिवली दि.०५ – जागतिक कर्करोग दिनानिमित्त डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाच्या वतीने उम्मीद -२०१९ कर्करोग जनजागृतीत कर्करोगावर यशस्वी मात केलेलेल्या रुग्णांनी आपले अनुभव कथन केले. या आजारातून यातून सुटका होणे अशक्य असल्याचा रुग्णाचा समज संपवून रुग्णांना नव्याने जगण्याचे बळ देण्या बरोबरच त्रासदायक उपचारांच यशस्वी सामना करण्याचे धैर्य रुग्णालय प्रशासनाकडून मिळाल्याने रुग्णांनी यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून एम्स रुग्णालयाच्यावतीने डोंबिवली जिमखाना सभागृहात यशस्वी लढा देणाऱ्या रुग्णाच्या अनुभव कथनाच्या उम्मीद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह महापौर विनिता राणे, ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, भाजप पदाधिकारी नंदू जोशी, भाजप साऊथ इंडियन सेलचे मोहन नायर,यांच्यासह एम्स रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. मिलिंद शिरोडकर, माजी नगरसेवक राजन मराठे, मेट्रन राजगोपाल संचालिका संपदा शिरोडकर उपस्थित होते.

हेही वाचा :- नाल्यात बेवारस सापडलेल्या ‘टायगर’ने मृत्यूला पुन्हा चकवा दिला

यावेळी कॅन्सरवर उपचार करणाऱ्या डॉ अमित चक्रवर्ती, मेडिकल अर्थोलॉजिस्ट राकेश पाटील. डॉ. सागर गायकवाड, ब्रेस्ट कॅन्सर सर्जन यश लोने, डॉ प्रशांत खडसे, भारत शिंदे, राहुल जानकर, बॉबी सदावर्ती, आशिष चौरसिया, सचिन गुप्ता, पराग तेलवणे, विशाल सकपाळ, जिग्नेश शहा, शिल्पा आगवाणी, कनन घरत, सुरेश सोनी या डॉक्टराचा सत्कार करण्यात आला. तर रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आपले मनोगत मांडले. प्रयत्न केले नाही तर यश मिळणार नसून शत्रू स्ट्रॉग आहे म्हणून त्याला स्ट्राँगपणे प्रतिकार केला पाहिजे असे यावेळी डॉक्टरांनी सांगितले. तर गरज पडली तर रुग्णालयातील मशीन आपल्या कुटुंबासाठी वापरता येईल का ? हा विचार करून आवश्यक सामुग्री डॉ. मिलिंद शिरोडकर तातडीने उपलब्ध करून देत असल्यामुळेच आपण रुग्णांना यशस्वी उपचार करू शकल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टराणी सांगितले. यावेळी बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कितीही संपत्ती असली तरी आयोग्य चांगले नसेल तर या संपत्तीचा काही उपयोग नाही. कॅन्सरशी लढा देणाऱ्या ९० टक्के रुग्णांना मोफत केमोथेरपि देणाऱ्या एम्स रुग्णालयाच्या सामाजिक कामाचे कौतुक केले. तर असाध्य आजारावर मात करत प्रत्येकाला जगण्याची वेगळी उम्मीद अशा कार्यक्रमातून मिळते यामुळे उम्मीद हे नाव समर्पक असल्याचे संगितले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कॅन्सर रुग्णांना प्रोटीन्स बॉल, प्रवासी सवलत कार्ड यासह अनेक प्रकारचे उपयोगी साहित्य असलेली गुडी बॅग भेट देण्यात आली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email