२ ऑक्टोबर रोजी मराठा मंडळ ठाणे तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

ठाणे दि.२८ :- गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा-२०१९ चे आयोजन मराठा मंडळ, ठाणे या सामाजिक संस्थेने बुधवार दि २ ऑक्टोबर २०१९ रोजी सायं ५ वा केले आहे. दहावी आणि बारावीच्या मार्च २०१९ च्या परीक्षेत ८० टक्के व अधिक गुण प्राप्त तसेच पदवीधर, पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा हा गुणगौरव सोहळा पहिला मजला छत्रपती शिवाजी मंदिर, मोनालिसा बिल्डींग मागे, हरी निवास, पाचपखाडी, ठाणे येथे होणार आहे.

हेही वाचा :- kalyan ; धावत्या लोकलवर दगडफेक प्रवासी जखमी

या प्रसंगी प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ गणपती यादव कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी आणि प्रमुख वक्ते डॉ प्रकाश खांडगे, राष्ट्रपती पदक प्राप्त साहित्यिक यांचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना लाभणार आहे. शिक्षण व नोकरी मध्ये मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले मराठा जात प्रमाणपत्र कसे मिळवावे? या संबंधी विशेष मार्गदर्शनही यावेळी करण्यात येईल. असे मंडळाचे चिटणीस राजेंद्र साळवी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

९७०२३५२५६६ ,८१०८८०३४२४ ,९२२१३१०९९६

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email