टिळकनगर शाळेच्या स्नेहसंमेलनात जागवल्या जुन्या आठवणी

डोंबिवली दि.०९  :- उच्च शिक्षण व व्यावसायिक उत्तुंग कर्तुत्व गाजवत, सामाजिक बांधिलकी जपणारे संजिव ब्रह्मे, कृत्रिम गर्भधारणा प्रणालीतील अग्रणी डॉ. विजय मनगोळी, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा कशेळकर, दत्तक संविधान क्षेत्रात झोकून काम करणाऱ्या डॉ. मृणाल परांजपे मराठे व रंगकर्मी मयुरी वाघ यांच्या कार्याचा परिचय सवंगड्यांना करून देणाऱ्या एका वाहिनीचे अमित भिडे यांच्या रंगतदार मुलाखतीमुळे, तसेच जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या आवर्तन 2020 या टिळकनगर विद्यामंदिराच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात रंगत आणली. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशात शिक्षकांचा व शाळेचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.

हेही वाचा :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये पत्रकार दिवस साजरा

या स्नेहसंमेलनाच्या सुरुवातीस विद्यमान बालविद्यार्थ्यांनी योग प्रात्याक्षिके, कत्थक नृत्य, पालखी देखावा आणि मोबाईल आधारित नाट्य सादर केले. ते पाहून माजी विद्यार्थ्यांच्या गतस्मृती जाग्या झाल्या. त्यानंतर माजी विद्यार्थिनी व विद्यमान उपमुख्याध्यापिका लीना ओक-मॅथ्यु यांनी सविता टांकसाळे, आर. के. महाजन, घैसास बाई, साईदास राठोड व मनीषा कुलकर्णी या माजी शिक्षकांशी साधलेल्या संवादातून धाक-शिस्तीमुळे मुलांचे बदललेले जीवन, तसेच बसवलेली नाटके, त्यामधील झालेल्या चुका इत्यादी रंजक आठवणी जागवल्या.

हेही वाचा :- डोंबिवलीच्या बत्तीगुलचा प्रश्न सुटणार ?

मुख्य समारंभात माजी विद्यार्थ्यांच्या बांधकाम समितीने बांधकामाचा उच्च दर्जा दाखवून काटकसर केल्याने बांधकाम खर्च 25 % कमी केल्याबद्दल माधव चिकोडी, कॅ. विनय देगावकर, माधव फाटक, कमलेश मराठे व परांजपे यांचा अध्यक्ष डॉ. शुभदा जोशी यांनी सत्कार केला. तर निधी संकलनात योगदान देणाऱ्या अमेय वैशंपायन, प्रशांत जोशी, संदीप वैद्य यांचाही सन्मान करण्यात आला. या स्नेहसंमेलनातील विशेष बाब म्हणजे संस्थेचे कार्यवाह डॉ. महेश ठाकूर यांच्या शालांत परीक्षा 1984 च्या विद्यार्थी समुहाने सुमारे 28 लक्ष रुपयांचा निधी जमवून शाळेस दिल्याबद्दल एका वर्ग खोलीला त्या विद्यार्थी समूहाच्या कोनशिलेचे नामांतर अनावरण माजी मुख्याध्यापिका सविता टांकसाळे यांच्या हस्ते झाले.

हेही वाचा :- वस्तूंपेक्षा मुलांची जास्त काळजी घेण्याची गरज

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार माजी विद्यार्थी गिरीश कुबेर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाल्यानंतर केलेल्या भाषणात कुबेर यांनी आपल्या देशात राष्ट्रीय संशोधनावर अवघा 1 % पर्यंत असण्याबद्दल खेद व्यक्त करत शिक्षणावर 13 % खर्च करणाऱ्या अमेरिका देशात शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे सांगितले. संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी स्वागतपर भाषणात इंग्रजी माध्यमाच्या शाळातील सर्व सुविधा दिल्याने मराठी माध्यमाच्या या शाळेत गेल्या 2 वर्षात 430 व 440 असे विद्यार्थी प्रवेश झाल्याचे सांगितले. तर अध्यक्ष डॉ. शुभदा जोशी यांनी माजी विद्यार्थ्यांच्या अमुल्य पाठबळामुळेच शाळेच्या इमारती उभारल्याचे कौतुकाने सांगितले. कार्यवाह डॉ. महेश ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले. सुमारे साडेचार तासांच्या या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचलन कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे यांनी केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email