रस्ता नाही यमदेव! खड्डा चुकवताच ट्रकने पादचाऱ्याला उडवलं
भिवंडी दि.१२ :- खड्डा चुकवायला गेलेल्या ट्रकने 60 वर्षीय पादचाऱ्याला उडवलं असल्याची माहिती समोर येत आहे. भिवंडी-वाडा मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. भिवंडीमधील रस्त्यांमुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा :- मनसेचा नवा फॉर्मूला, सभा रद्द होऊ नये म्हणून शोधली युक्ती
खड्डा चुकवायला गेलेल्या ट्रकने 60 वर्षीय पादचाऱ्याला उडवलं असल्याची माहिती मिळत आहे. कुडूस इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. अपघातात रामप्रसाद गोस्वामी (वय 60) यांचा मृत्यू झाला असून तो मुसारणे इथल्या एका कंपनीत वॉचमेन म्हणून कार्यरत होता तो मूळचा बिहार इथल्या असून वाडा तालुक्यतील कुडूस इथे राहत होता.
Hits: 1