विधानसभा निवडणुकीला विरोध नाही, ईव्हीएमविरोधच ‘मनसे’च्या रडारवर !

मुंबई दि.१६ – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही जागा लढवली नाही. परंतु, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना विरोध केला. तसेच पुरावे सादर करत भाजपला धारेवर धरले. परंतु, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भाजपने २०१४ पेक्षा यावेळी मोठे यश मिळवले. त्यामुळे विरोधकांचा हिरमोड झाला. मात्र, भाजपचा विजय हा ईव्हीएममुळेच झाल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी नारा बुलंद केला. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतल्या. राज यांनी ईव्हीएमसंदर्भात विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती.

हेही वाचा :- महावितरणच्या ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा निश्चय

राज यांनी परवा घेतलेल्या कार्यक्रमात देखील आपली भूमिका स्पष्ट केले. तसेच मनसे कार्यकर्त्यांना ईव्हीएमविरोधी चळवळ उभी करण्याच्या सूचना केल्या. राज यांच्या या लढ्याला विरोधी पक्षांचा देखील पाठिंबा मिळत आहे. राज यांच्या पाठिशी मोठमोठी आंदोलने उभारण्याचा अनुभव आहे. राज्यातील टोल वसुली, मराठी पाट्यांचे आंदोलन आणि भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये अधिक प्राधान्य देण्याचा मुद्दा यामुळे राज ठाकरे देशभरात गाजले होते. मराठीच्या मुद्दावर राज यांनी २००९ मध्ये मोठे यश मिळाले होते. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्षांची वाताहत झाली. त्यात मनसेची स्थिती काही वेगळी नव्हती. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना नवीन कार्यक्रमही दिला आहे. दरम्यान अपयश विसरून राज ठाकरे पुन्हा एकदा मोठ आंदोलन उभारण्याच्या तयारीला लागले आहे.

तमतमाए amit shah ने loksabha में कहा – PoK के लिए जान दे देंगे
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email