डोंबिवलीत उद्या नो हॉर्न डे

कल्याण दि.२५ :- डोंबिवलीतील वाढती लोकसंख्या,वाढती वाहने ,अपुरे रस्ते ,फेरीवाले या मुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते शिवाय हवा व ध्वनी प्रदूषण होत असते याबद्दल जनजागृती करण्यासाठी येथील पै लायब्ररीतर्फे रविवार २६ जानेवारी रोजी एक दिवस नो हॉर्न डे, पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबद्दल माहिती देताना पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै म्हणाले, वाहनधारकांनी एक दिवस हॉर्न गरज असेल तरच वाजवावा अथवा वाजवूच नये, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा :- डोंबिवली एमआयडीसी मधील कारखाने सेफ्टी ऑडिट शिवाय सुरू

यासाठी डोंबिवलीतील 70 शाळा आणि महाविद्यालयांल विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे. तसेच वाहतूक पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. शहरातील १० प्रमुख चौकांत कार्यकर्ते “नो हॉर्न डे, मी आज हॉर्न वाजवणार नाही”, असे फलक घेऊन उभे राहणार आहेत. हॉर्नमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, हॉस्पिटल मधील रुग्ण यांना त्रास होतो वाढत्या ध्वनी प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी नो हॉर्न डे पाळण्यात येत असून डोंबिवलीकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन पै यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email