स्त्रियांच्या प्रगतीशिवाय कुठलाही देश प्रगती करु शकत नाही लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी महिलांचा राजकीय सहभाग महत्वाचा

नवी दिल्ली, दि.०४ – शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन असून भारतासारख्या देशात महिला सक्षमीकरणाचा तो पाया असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.ते आज हैदराबादमधल्या युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर वुमेनमध्ये दीक्षांत समारंभात बोलत होते. लोकसंख्येचा अर्धा हिस्सा असलेल्या महिलांना त्यांचा आवाज व्यक्त करता आला पाहिजे. महिलांना सक्षम करणे म्हणजे संपूर्ण मानवजातीला सक्षम करणे असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वच पातळ्यांवर महिला सक्षमीकरणाची गरज व्यक्त करुन उपराष्ट्रपतींनी समानता आणि समान हक्कांचा आग्रह धरला. देशातील लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी महिलांचा राजकीय सहभाग वाढण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. मातृभाषा, पालक, मूळ स्थान, मातृभूमी आणि गुरु या पाच गोष्टी विद्यार्थ्यांनी कधीही विसरु नयेत, असा सल्ला उपराष्ट्रपतींनी दिला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email