नितीन नांदगावकरांनी निर्णय घेण्यात घाई; भविष्यात त्यांना नक्की जाणीव होईल’ – अविनाश जाधव
Hits: 0
ठाणे दि.०८ :- नितीन नांदगावकरांनी निर्णय घेण्यात खूप घाई केली. त्यांना भविष्यात याची नक्की जाणीव होईल, असं वक्तव्य ठाणे-पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष व ठाणे शहराचे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी केले आहे. अविनाश जाधव म्हणाले की, नितीन नांदगावकर मनसेचा एक चांगला कार्यकर्ता होता. नितीनने निर्णय घेण्याची खूप घाई केली असून त्याला भविष्यात नक्की जाणीव होईल. तसेच त्यांना जर काही अडचणी होत्या तर राज ठाकरे यांच्याशी चर्चा करुन नक्की मार्ग काढता आला असता असं वक्तव्य अविनाश जाधव यांनी केलं आहे.
हेही वाचा :- Dombivali ; टिकटॉक च्या नादात १४ वर्षीय मुलाने सोडले घर
नितीन नांदगावकरांचा शिवसेना प्रवेश झाल्यानंतर सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आले होते. तर, अनेकांना हाच प्रश्न पडला होता की, नितीन नांदगावकर शिवसेनेत कशामुळे? विधानसभेची उमेदवारी न दिल्यानेच त्यांनी सेनाप्रवेश केल्याचंही बोललं जात होतं. मात्र, त्यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलंय. ”राज ठाकरे हे दैवत होते, आहेत अन् राहणार. पण, त्या राजसाहेबांना ज्या साहेबांनी शिवसेना सोडली, त्या बडव्यांना घेतलं होतं.
हेही वाचा :- Dasara Wishes In Marathi ; हार्दिक शुभेच्छा
मला राजसाहेबांबद्दल काहीच बोलायच नाही, ते दैवतच आहेत. पण, आजूबाजुच्या बडव्यांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला,” असे स्पष्टीकरण नितीन नांदगावकरांनी केले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आजूबाजूच्या बडव्यांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागल्याचे स्पष्टीकरण नितीन नांदगावकर यांनी दिले होते. मात्र नितीन नांदगावकरांनी निर्णय घेण्यात खूप घाई केली असल्याचे वक्तव्य ठाणे- पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष व ठाणे शहराचे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी केले आहे.