ठाण्यात राष्ट्रवादी- मनसेचं ठरलं! अविनाश जाधवांचा मार्ग मोकळा

Hits: 2

ठाणे दि.१० :- मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढत आहे. दरम्यान ठाण्यात मात्र मनसेची राष्ट्रवादीसोबत आघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या आघाडीवर शिक्कामोर्तब झालं आहे.

हेही वाचा :- खड्ड्यामुळे तरुणीचा बळी, लग्नाच्या खरेदीवरुन येताना अपघात

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उघडपणे भाजपला विरोध केल्यानंतर अचानक त्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांमधील जवळीक वाढू लागली. त्यानंतर कधी शरद पवारांच्या घरी तर कधी विमानात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेल्या सर्वांनी पाहिल्या.

हेही वाचा :- रिलायन्स जिओ 10 ऑक्टोबरपासून इतर ऑपरेटरला कॉल करण्यासाठी 6 पैसे/ मिनिट शुल्क आकारण्यास सुरूवात करेल

या चर्चांचे फलित विधानसभा निवडणुकीत दिसू लागले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची आघाडी होईल, अशी अनेकांना आशा होती, परंतु काही कारणास्तव ही आघाडी होऊ शकली नाही. ठाण्यात मात्र मनसेची राष्ट्रवादीसोबत आघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.