नवीमुबई पोलीस आयुक्तांचा प्रताप न्याय मागण्यासाठी आलेल्या कुटुंबालाच केल अपमानित
Hits: 0
मुबंई दि.२४ :- पोलीस अधिकाऱ्याच्या विरुध्द एका विनयभंग केस मध्ये पोलीस आयुक्तांकडे मदत मागण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला आयुक्तांनी उलट फटकारलं आणि पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या वाईट बोलण्यामुळे कुटुंबाला व पीडित मुलीला मानसिक धक्का बसला व ती तिथेच बेशुद्ध पडली, कुटुंबांनी तिला जवळच्याच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले, तिथे तिची तब्येत अजून खराब होऊन तिला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा :- ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी ही अकबराच्या न शिजणाऱ्या( खिचडी) बिर्याणी सारखी
मुलीचा विनय भंग केलेला अधिकारी हा डीआयजी लेव्हलचा असल्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्तांनी करावा ही शरमेची गोष्ट आहे, हे कुटुंब आयुक्तनाकडं न्याय मागण्या साठी गेले होते अपमान करून घेण्यासाठी गेले नव्हते, आपल्याकडे न्याय मागायला आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या शंकेचं सांत्वन करून, तुमच्या तक्रारीची योग्य चौकशी करून, तुम्हांला योग्य न्याय मिळवून देईन असे आश्वासन देण्याचे काम आयुक्तांचे आहे.
हेही वाचा :- मुंबई प्रवेश द्वारावरील टोल वसुली बंद करण्याची मागणी…
तुमच्या कडे येणाऱ्या माणसांना उलट सुलट बोलून त्यांचा अपमान करायचा नसतो, आणि आपल्या चुकलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना वाचवायचं नसत, या विनयभंगाची तक्रार ज्या पोलीस अधिकारी च्या विरुध्द आहे, त्याच्या बद्दल बोलायला कोणीही पोलीस अधिकारी तयार नाही की पोलीस स्टेशन तक्रार घ्यायला तयार नाही म्हणून हे पीडित कुटुंब आयुक्तांना भेटायला गेले होते.