‘फोनी’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्यासाठी नौदलाच्या जहाजं आणि विमानांना सज्ज राहण्याच्या सूचना
नवी दिल्ली, दि.०२ – प्रलयंकारी ‘फोनी’ चक्रीवादळ विशाखापट्टणमपासून 430 किलोमीटर आणि पुरीपासून 680 किलोमीटरवर केंद्रीत असून पूर्व नौदल विभाग या चक्रीवादळावर लक्ष ठेवून आहे. आगामी 12 तासात हे वादळ उत्तर-पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता असून 3 मे रोजी गोपालपूर आणि चंदबलीदरम्यान ओदिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
यावेळी ताशी 175 ते 185 प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हा वेग 205 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्यासाठी विशाखापट्टणम येथे नौदल जहाजांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आंध्रप्रदेश आणि ओदिशात पाणबुडे आणि वैद्यकीय सहाय्यता पथकंही सज्ज ठेवण्यात आली आहेत. नौदल हवाई तळांवर विमानंही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
Please follow and like us: