तंत्रज्ञान विषयक वस्त्रोद्योगाशी संबंधित राष्ट्रीय परिषदेचे मुंबईत आयोजन
नवी दिल्ली, दि.२७ – तांत्रिक वस्त्रोद्योगाशी सबंधित राष्ट्रीय परिषद येत्या 29 जानेवारीला मुंबईत होणार आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या टेक्नोटेक्सचा हा कर्टन रायझर कार्यक्रम असेल. केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन ईराणी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होईल. वस्त्रोद्योग तंत्रज्ञानविषयक एचएसएन कोड्स देखील या परिषदेत जारी केले जाणार आहेत. या परिषदेदरम्यान विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. ज्यात तांत्रिक वस्त्रोद्योग, उत्पादन क्षेत्रातील संधी आणि जागतिक स्तरावरील किमती, नवभारतातील तांत्रिक वस्त्रोद्योग कोड, गुंतवणुकीच्या संधी यावर केंद्र सरकारच्या विविध विभागांचे अधिकारी, नीती आयोग आणि आयआयटी व वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी ह्या चर्चासत्रांमध्ये सहभागी होतील.
हेही वाचा :- तंत्रज्ञान विषयक वस्त्रोद्योगाशी संबंधित राष्ट्रीय परिषदेचे मुंबईत आयोजन
तांत्रिक वस्त्रोद्योग म्हणजे, तंत्रज्ञान आणि इतर कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या कापडांची निर्मिती करणारा विभाग होय. ह्या विभागात केवळ कापडच नव्हे तर कृषी, वैद्यकीय क्षेत्र, पायाभूत सुविधा, ऑटोमोटीव्ह, एअरोस्पेस, क्रीडा, संरक्षण आणि पॅकेजिंग अशा विविध क्षेत्रासाठी लागणाऱ्या वस्त्र आणि इतर वस्तूंच्या उत्पादनांचा समावेश होतो. वस्त्रोद्योग क्षेत्रात या विभागाचे मोठे महत्व असून, हा देशाच्या अर्थव्यवस्थेत वेगाने विकसित होणारा विभाग आहे. येत्या काही वर्षात या विभागात दुप्पटीने वाढ होण्याचा अंदाज आहे. 2020-21 पर्यत या विभागाचा बाजारपेठेतील उलाढाल 2 लाख कोटी पर्यंत पोहचेल असा अंदाज आहे. ह्या उद्योगात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा :- राष्ट्रीय मतदान दिनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपतींनी केले संबोधित
भारतातील तांत्रिक वस्त्र उद्योगाच्या आधारभूत सर्वेक्षणानुसार, देशात जवळपास 2100 युनिट यंत्र मागाद्वारे तंत्रज्ञानात्मक पद्धतीने वस्त्रे बनवितात आणि त्यातील बहुतेक महाराष्ट्र आणि तमिळनाडुनंतर गुजरातमध्ये नियमित केली जातात. जागतिक तांत्रिक बाजारपेठेत वस्त्रोद्योग निर्मितीत भारताचा १२ विभागांपैकी 4-5% हिस्सा आहे. भारतातील एकूण वस्त्रोद्योग मूल्य मालिकेत, तांत्रिक वस्त्र विभागाचा 12-15% सहभाग आहे, तर काही युरोपियन देशांमध्ये एकूण वस्त्रोद्योग मूल्य मालिकेत तांत्रिक वस्त्रांच्या मूल्य श्रृंखलेत 50% वाटा आहे.