विठ्ठलवाडी स्मशानभूमितील मुडढ्यांवर मुतारी ; महापालिकेचा आणखीन एक धक्कादायक प्रकार !

कल्याण दि.२२ :- गेल्या वर्षी विठ्ठलवाडी पुर्वेतील फुटपाथ उखडून चक्क फुटपाथवर सुलभ शौचालयाची अनधिकृतपणे निर्मिती करण्याचा घाट महापालिकेचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराच्या संगनमताने होत होता परंतु या अनधिकृत बांधकामाची समाज माध्यमांवर जोरात चर्चा झाल्याने हे बांधकाम अर्धवटपणे सोडून देण्यात आले आहे. हे प्रकरण काहीसे मिटल्यात जमा असल्याचे दिसत असतांनाच आता विठ्ठलवाडी स्मशानभूमितील बालमृतकांचे मृतदेह दफन करण्याच्या जागेचा बराचरा भाग व्यापून आणि स्मशान भूमिची संरक्षण भिंत तोडून चक्क गाडल्या गेलेल्या बालकांच्या मृतदेहावर मुतारी अर्थात सुलभ शौचालय बांधण्याचे काम निर्लज्य पणे चालु असल्याचा धक्का दायक प्रकार दिसून येत आहे.

हेही वाचा :- प्रतीक गावडे खून प्रकरण अवघ्या २४ तासात तिघे आरोपी गजाआड कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई

समाज माध्यमावरच मिळालेल्या माहीतीनुसार संबंधीत प्रभागाच्या नगरसेवकाने या परिसरातील रिक्षाचालक आणि व्यापाऱ्यांसाठी मुतारीची मागणी प्रशासनाकडे केली होती. या नुसार प्रशासनाने संबंधीत ठेकेदाराला बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर विठ्ठलवाडी स्मशानभूमि जवळ नवीन सुलभ शौचालय बांधण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु या परवानगीचा ठेकेदाराने स्वःताच्या स्वार्थासाठी आपल्या परीने अर्थ लावून विठ्ठलवाडी स्मशानभूमिची मुख्य रस्त्याच्या बाजुची संरक्षण भिंत तोडून ज्या जागेवर बालमृतकाचे मृतदेह दफन केले आहेत त्या जागेची बहुतांश जमीन ही या शौचालयासाठी वापरात आणून या जागेवर शौचालयाची इमारत उभी करण्याचे काम सुरू केले आहे. मुळात विठ्ठलवाडी स्मशान भूमित मृतदेह दफन करण्यासाठी असणारी जागा कमी पडत असतांनाच आहे त्याच जागेवर अतिक्रमण करून हे शौचालय बांधण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा :- आदिवासींच्या कोरड्या पाषाणात प्रकटला माणुसकीचा झरा तिसऱ्या प्रयत्नानंतर बोअरवेलला लागले पाणी

सदर चे काम हे महापालिकेच्या नियमांस अनुसरून महापालिकेच्या संबंधीत अधिकाऱ्याच्या देखरेखीखालीच होत असतांना मृत बालकांच्या मृतदेहावर बांधल्या जाणाऱ्या या शौचालयाच्या कामामुळे एक प्रकारे माणूसकीला काळीमा फासली जात असून संबंधीत ठेकेदार आणि पालिका अधिकारी हे या ठिकाणी गाडल्या गेलेल्या मड्याच्या टाळ्रवरील लोणी उघडपणे खात असल्याची भावना जागृक नागरीकांमध्ये निर्माण झाली असून माणूसकीला काळीमा फासणाऱ्या पालीकेच्या या कृती प्रती परिसरातील नागरीकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email