मुस्लीम युवकाने रोजा तोडून हिंदू गर्भवती महिलेचा वाचवला जीव

एका मुस्लीम युवकाने रोजा तोडून हिंदू गर्भवती महिलेचा जीव वाचावा यासाठी रक्तदान करत माणुसकीचे दर्शन घडवले. या गर्भवती महिलेला प्राण धोक्यात असल्याने या २२ वर्षीय तरुणाने रोजा तोडून रक्तदान केले. अशरफ खान असे राजस्थानातील नागौर येथील या तरुणाचे नाव आहे.  भारतीय सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे अशरफचे स्वप्न आहे. या साठी तो तयारी करत आहे. अशरफने शनिवारी सोशल मीडियावर एक मेसेज पाहिला. एका गर्भवती महिलेला तातडीने रक्ताची गरज असल्याचे मेसेजमध्ये नमूद करणात आले होते.  मेसेज पाहताच रक्तदानाचा निर्णय हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या या गर्भवती महिलेचे नाव आहे सावित्री देवी.

या महिलेला बी निगेटीव्ह रक्ताची गरज होती. महिलेचे हिमोग्लोबीन सतत कमी होत होते. सावित्री यांना चुरू जिल्ह्यातील सुजानगड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  हा मेसेज पाहिल्यानंतर आपण रक्तदान करायचे असा तत्काळ निर्णय अशरफने घेतला. त्याने मेसेजवरील फोन नंबरवर संपर्क केला. दिवसभर रोजा असल्याने रोज सोडल्यानंतर संध्याकाळी आपण रक्तदान करू असे अशरफने सांगितले. मात्र, रक्ताची तत्काळ आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एका मिनिटात घेतला निर्णय आता काय करावे हे अशरफला समजेनासे झाले. त्याने मिनिटभर विचार केला आणि आपण आताच रक्तदान करायचे, मग रोजे तोडावे लागले तरी बेहत्तर, असा निर्णय त्याने घेतला. त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याने रक्तदान करण्यासाठी आपला रोजा तोडला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email